Travel Writers & Photographers

Sandeepa and Chetan. Married. Indians. Exploring Travel as Lifestyle. Featured by National Geographic, Yahoo. Stories, Photos, Videos at http://sandeepachetan.com

  • 184
    stories
  • 57K
    words
184
stories for
22
publications
Sandeepa Chetan's stories for
Show all
Nz wel201604198247 m article
blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

37 पॉझिटिव्ह वेलिंग्टन

ही हवा अतिशय सोसाट्याची. वेगवान मेट्रो आयुष्य, आणि त्याहून वेगानं वाहणारे थंड वारे. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन ही जगातल्या सर्वांत वाहत्या हवेच्या शहरांपैकी एक. वेलिंग्टनच्या फुटपाथवरून चालत आम्ही सकाळचे ‘वॉटरफ्रंट’कडे निघालोय आणि वारा एकदम पडलाय...

blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

38 ऐसपैस अनुभव

एका दिवसात माणूस किती अनुभवतो? अक्षरशः अगणित गोष्टी! त्याची संवेदना जागी असली की मन टिपकागदासारखं काम करत राहातं आणि दिवसाअखेरी तळाशी एक मोठ्ठं तळं साठतं अनुभवांचं! त्या तळ्य ात डोकावून पाहिलं की असे साधे पण समृद्ध करणारे रंग चमकून जातात…

blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

40 सुंदराचे सोहळे!

न्यूझीलंडमध्ये जैविक संपत्ती अशाच प्राणपणानं जपली जाते, त्याचं संगोपन केलं जातं. या सुंदर भूमीला कुठलाही बाहेरचा डाग लागू, नये याची काळजी घेतली जाते…
आपल्या आवडीची एखादी आकर्षक अंगठी, एखादं दुर्मिळ पुस्तक असावं. अशा वस्तू मग खास कार्यक्रमासाठी मोठ्या दिमाखात ...

blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

41 छोटंसं मोटुएका

अॅबेल टॅस्मन नॅशनल पार्कला जाताना ‘मोटुएका’ शहरात थांबलो होतो. आता परत येताना तिथंच मुक्काम करायचं ठरलं. शक्यतो हे थांबायचं ठिकाण नाही. सगळेजण नेल्सन नावाच्या मोठ्या शहरात परत जातात. कायतेरीतेरीच्या बस थांब्यापाशी गेल्यावर असं लक्षात आलं की मोटुएका मधूनही आपल्याला गोल्डन बे ...

blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

42 मन शुद्ध तुझं

अक्षरशः आरस्पानी निळंशार पाणी आमच्यासमोर उसळत होतं. त्या उसळणाऱ्या पाण्याला एक लय होती. आतल्या वनस्पती आणि वाळू त्या वर येणाऱ्या पाण्यानं वरखाली होत होती! उघड्या डोळ्यांनी आरपार शेवटपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत स्वच्छ आणि स्वच्छ पाणी! एखाद्या राजकन्येच्या जीवघेण्या ...

Nz auc201604187983 m article
blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

36 ‘सरळ’ वळणाचा देश!

आम्ही काचेला नाक चिकटवून बाहेर पाहण्यात गुंग झालो. पांढरी मेंढरं आणि हिरवी कुरणं सगळा रस्ताभर दिसत राहिली. मधून छोटी शहरं मागे टाकली जात होती. दोन शहरांच्या मध्ये फक्त चिमुकल्या सुंदर हिरव्यागार टेकड्या. रस्त्याच्या कडेनं...

Nz auc201604117498 article
blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

35 गुहेतलं गुपित

आळसावलेल्या रविवारी सकाळी, ‘आता कुठं जाऊ यात’ हा विचार करत बसलोय. अचानक बेत ठरला आणि लगेच तयारीला लागलो. आम्ही काविटी गुहा बघायला जाणार होतो. ह्या गुहा अजब आहेत म्हणून आम्हाला सांगण्यात आलं होतं! फार लांब नव्हतं, फक्त...

Nz mur201604177908 m article
blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

34 ‘हक्काचं’ ऑकलंड

‘हरित न्यूझीलंड’ विषयी जे ऐकलं होतं त्याचा अनुभव मुक्कामाच्या पहिल्याच रात्री आला. जसा मुक्काम वाढला तसं लक्षात आलं की ही सगळ्या न्यूझीलंडवासीयांची हक्काची जंगलं आहेत. तिथं त्यांना रिझर्व्हज म्हणतात. अतिशय प्रेमानं, काळजीपूर्वक जपलेली ही पार्क्स इथली शान आहेत…

Au gol201604097288 m article
blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

33 वाटाघाटीच्या वाटेनं...

न्यूझीलंड प्रवासाची सुरुवात वाटाघाटीपासून होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. विमान आम्हाला सोडून उडून गेलं होतं. विमान कंपनीशी वाटाघाटी करीत पहाटे पाचला आलेलो आम्ही शेवटी कंपनीच्या ईमेलच्या भरवशावर दुपारी तीन वाजता निघालो…

In koc201604077128 m article
blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

31 32 इथून पुढे…न्यूझीलंड

घरी आल्या आल्या पहिले काही आठवडे जी धांदल झाली ती विचारूच नका. पण ही प्रवासाची पळापळ नव्हती. नातेवाईक, मित्रमंडळी, जेवणी-खाणी असा दर आठवड्याचा भरगच्च कार्यक्रम...

Beach article
blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

30 शेवट आणि शून्य

मनाऊसच्या विमानतळावरून आमच्या विमानानं रिओकडे झेप घेतली. अॅमेझॉनचा हिरवा भरजरी पदर खिडकीतून एकदा शेवटचा फडफडताना पाहिला. रिओपर्यंतचं अंतर हवाई मार्गानं तब्बल चार तासांचं. देशांतर्गत प्रवासात एवढा विस्तीर्ण...

Co lat201510213337 m article article
blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

29 परतीची वाट

जगातली सर्वांत आळसावलेली आंतरराष्ट्रीय सीमा तुम्हाला बहुधा अॅमेझॉनमध्येच सापडेल. पेरूमधून आम्ही बाहेर पडत होतो. ब्राझीलच्या दिशेनं प्रवास सुरू झाला होता. दोन तीन दिवसांची ‘सहल’ करत ब्राझीलमधली अॅमेझॉन नदी पाहात जावं म्हणून सीमेवर गेलो. प्रथेप्रमाणे तपासणी झाली. उगवत्या सूर्याला रामराम करून सांतारोसा ह्या पेरूच्या अॅमेझॉनमधल्या शेवटच्या टिंबाकडे सरकलो…

Amazon article
blogs.maharashtratimes.indiatimes.com

Maharashtra Times Blog

28 उद्धवा, अजब तुझे अॅमेझॉन!

अचानक पुन्हा ढोल वाजू लागले आणि लाल कपडे केलेले पुरुष आणि स्त्रिया वर्तुळ करून नाचायला लागल्या. आम्हीही सामील झालो. हाडं, सापाची कात, गवत, झाडांची मुळं असल्या गोष्टींचा वापर करून आदिवासी स्त्रियांनी अतिशय सुरेख शोभेच्या वस्तू आणि दागिने तयार केले होते!